मुंबई- गेल्या चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने आज मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा बाधित झाली आहे. त्यामुळे सकाळपासूनच घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.
संततधार पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गच्च, वाहतूक धीम्या गतीने - slowing down
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून संततधार असलेल्या पावसाने सकाळी माटुंगा सायन रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने चाकरमानी जागोजागी रेल्वेत अडकले. त्यामुळे सकाळपासूनच घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.
संततधार पावसाने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गच्च
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून संततधार असलेल्या पावसाने सकाळी माटुंगा सायन रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने चाकरमानी जागोजागी रेल्वेत अडकले. रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने काही प्रवाशी थांबलेल्या रेल्वेतून जात रेल्वे ट्रॅक पार करत जवळच्या स्थानकावर पोहोचत आहेत. तर सततच्या या पावसामुळे प्रवाशांना रिक्षाही मिळत नसून वाहतूकदेखील धीम्या गतीने सुरू आहे.