महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर मधील मोबाईल दुकानाला आग; जीवितहानी नाही - FIRE

घाटकोपर मधील मोबाईल दुकानाला आग

By

Published : Mar 29, 2019, 4:42 PM IST

Updated : Mar 29, 2019, 5:31 PM IST

2019-03-29 16:12:28

घाटकोपर मधील मोबाईल दुकानाला आग; जीवितहानी नाही

मुंबई-  घाटकोपर पश्चिम येथील मोबाईल दुकानाला दुपारच्या सुमारास आग लागली. आग भडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घाटकोपर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या घाटकोपर अतिथीगृहा खालील टीप-टॉप मोबाईल दुकानाला दुपारच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

Last Updated : Mar 29, 2019, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details