महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएमसी बँकेच्या संचालकांचे भाजपशी संबंध - गौरव वल्लभ

भारतीय जनता पक्षाचे आमदार सरदार तारा सिंग यांचे चिरंजीव रणजित सिंग हे गेल्या 13 वर्षांपासून पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत.

गौरव वल्लभ

By

Published : Oct 7, 2019, 5:17 PM IST

Updated : Oct 7, 2019, 7:18 PM IST

नागपूर- पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अडचणीत आल्यानंतर रिजर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारावर निर्बंध टाकल्यानंतर खातेदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बँकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर अनेक खुलासे होऊ लागले आहेत. पीएमसी बँकेतील संचालकांचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला आहे.

बोलताना गौरव वल्लभ

भारतीय जनता पक्षाचे आमदार सरदार तारा सिंग यांचे चिरंजीव रणजित सिंग हे गेल्या 13 वर्षांपासून पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. ते एचडीआयएल या रियल इस्टेट्स कंपनीत सुद्धा संचालक आहेत. ही कंपनी एनपीए झाली असताना सुद्धा पीएमसी बँकेने कर्ज दिले होते. हे कुणाच्या इशाऱ्यावर झाले याचा खुलासा आता होऊ लागला असल्याचे सांगत गौरव वल्लभ यांनी भाजप आरोपींना वाचवत असल्याचा आरोप केला. या कंपनीच्या मालकीचे विमान आणि योर्ड आहेत, असे असताना पीएमसी बँकेने एचडीआयएल कंपनीला कर्ज देऊन सामान्य ठेवीदारांना वेठीस धरले असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला आहे. रिजर्व्ह बँकेने तत्काळ पैसे काढण्याची मर्यादा उठवून सामान्य खातेदारांना दिलासा देऊन आरोपी संचालकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतर घोटाळेबाजांप्रमाणे या बँकेचे संचालक सुद्धा देश सोडून पळून जाऊ शकतात, अशी भीतीसुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन, अनेक देशातील भन्ते राहणार उपस्थित

Last Updated : Oct 7, 2019, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details