महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा डाव उधळला; टोळी जेरबंद

By

Published : Feb 18, 2021, 9:57 AM IST

Updated : Feb 18, 2021, 12:22 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बदनामीसाठी षडयंत्र रचण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीमध्ये अमली पदार्थ ठेवण्यासाठी ही टोळी कट रचत होती. तत्पूर्वी पोलिसांनी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा डाव उधळला
ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा डाव उधळला

मुंबई- मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पथकाने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बदनामीसाठी षडयंत्र रचण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीमध्ये अमली पदार्थ ठेवण्यासाठी ही टोळी कट रचत होती. तत्पूर्वी पोलिसांनी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. राजकीय द्वेषातून हे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रकरण कसे समोर आले

अमली पदार्थ विभागाचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जानेवारीला त्यांच्या विभागाला माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती मुंबईतील डोंगरी विभागामध्ये अमली पदार्थ घेऊन जाणार आहे. या माहितीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यातील एका पथकाने सापळा लावला. प्राप्त माहितीनुसार संशयित घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आयाज मंडवाला असे त्या अमली पदार्थ तस्काराचे नाव होते. त्याच्याकडून 150 ग्रॅम अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले.़

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीत ठेवायचे होते ड्रग्ज-

तस्कर मंडवाला याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, आरोपी अमली पदार्थ विकण्यासाठी नाहीतर एका राजकीय व्यक्तीच्या गाडीमध्ये बदनामी करण्यासाठी ठेवण्यासाठी आणले होते. ती राजकीय व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दक्षिण विभागातील सचिव विजय कोळी असल्याचीही माहिती अधिक चौकशी केल्यानंतर समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी निगडीत अन्य चार जणांना अटक केली. या सर्वांची चौकशी सुरू असल्याची माहितीही नलावजे यांनी दिली.

म्हणून रचला कट-

आरोपींपैकी अब्दुल अजिज शेख ऊर्फ राजू जफर शेख आणि असिफ सरदार हे या प्रकरणाचे सुत्रधार आहेत. अब्दुल हा ताडदेव विभागात अवैधरित्या झोपडपट्टीचे नियमितीकरण करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु राष्ट्रवादीचे सचिव विजय कोळी यांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे कोळी यांना ड्रग्स प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी अब्दूलने ही योजना आखली होती.

Last Updated : Feb 18, 2021, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details