मुंबई -अंधेरी पूर्वेला बिसलेरी कंपनीसमोर फर्निचरच्या गाळ्याला आज संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
अंधेरीत फर्निचरच्या गाळ्याला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश - अंधेरी
फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागल्याने परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशम दलाचे ४ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अंधेरीत फर्निचरच्या गाळ्याला लागलेली आग
फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागल्याने परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशम दलाचे ४ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या आगीला २ नंबरची वर्दी घोषित करण्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST