महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

UPSC : खूशखबर ! यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षणाची सोय सुरू - UPSC Exam Fee Payment Last Date

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्याच पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या देखील परीक्षा होऊन भारतीय प्रशासन सेवेमध्ये उच्च रीतीने नोकरी करता येते. त्यासाठी लाखो विद्यार्थी तयारी करतात. मात्र फारच थोडे विद्यार्थी यातून उत्तीर्ण होऊन पुढे येतात. त्यासाठी खास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची सोय सुरू करण्यात आलेली ( Free coaching facility UPSC student ) आहे.

UPSC
यूपीएससी

By

Published : Nov 5, 2022, 11:24 AM IST

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्याच पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या देखील परीक्षा होऊन भारतीय प्रशासन सेवेमध्ये उच्च रीतीने नोकरी करता येते. त्यासाठी लाखो विद्यार्थी तयारी करतात. मात्र फारच थोडे विद्यार्थी यातून उत्तीर्ण होऊन पुढे येतात. त्यासाठी खास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची सोय सुरू करण्यात आलेली ( Free coaching facility UPSC student ) आहे.

मोफत प्रशिक्षणाची सोय :यासंदर्भात राहुल कोठेकर या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ( UPSC student ) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ईटीवी भारतच्यावतीने संवाद साधला. त्याने सांगितले की," तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल सरकारचे सर्व कोर्स शिकवणारे उच्च दर्जाचे महाविद्यालय देखील परिपूर्ण नाही. तेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे कसे जावे ? कोणते प्रयत्न करावे? कसा अभ्यास करावा? कोणकोणत्या ग्रंथांचा पुस्तकांचा अभ्यास करावा? अभ्यासाच्या पद्धती कशा असाव्यात? त्यासाठी कोणकोणते साधन वापरायचे? हे सगळे युवकांना कसे ठाऊक होणार? या सर्वात महागाई प्रचंड वाढत आहे. आपल्या रुपयाचे अवमूल्यन होत आहे. आणि अमेरिकेचा डॉलर मात्र वधारतो आहे. त्या स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना महागडे साधन कुठून मिळणार. या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाची सोय ही एक आनंदाची बाब आहे."

प्रवेश प्रक्रिया सुरू :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू( UPSC Admission Process Start ) झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने २५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. के.एस. जैन यांनी दिली. ऑन लाईन अर्ज भरणे 4 नोव्हेंबरपासून सुरुवात तर अंतिम दिनांक 25 नोव्हेंबर असेल.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर तर प्रवेश परीक्षा 4 डिसेंबर 2022 रोजी ( UPSC Exam Fee Payment Last Date ) समाप्त होईल. विद्यार्थ्यांचे प्रवेश लेखी परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीनंतर ठरवले जातील. ती सामायिक परीक्षा उत्तीर्ण झाले की, ऑनलाइन पोर्टलवर जाऊन लॉग इन करून आपल्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडावेत. परिक्षेबाबत सर्व माहिती खालील संकेतस्थळ येथे असेल. https://www.siac.org.in/यासंदर्भात राज्य शासनाच्या प्रशासकीय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळावर त्वरित संपर्क जाऊन अधिक तपशील पहावा.

ABOUT THE AUTHOR

...view details