महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये राज्यात 455 सायबर गुन्ह्यांची नोंद; 239 जणांना अटक - mumbai lockdown news

लॉकडाऊन काळात कोरोना संदर्भात आक्षेपार्ह मेसेज समाजमाध्यमांवर शेअर केल्या प्रकरणी राज्यात 455 गुन्हे नोंद झाले आहेत. याप्रकरणी 239 जणांना पोलिसांनी अटक केलीय.

cyber crime cases during lockdown
लॉकडाऊनमध्ये राज्यात 455 सायबर गुन्हे

By

Published : Jun 4, 2020, 3:07 PM IST

मुंबई-लॉकडाऊन काळात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 455 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून 239 आरोपीना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये समाज माध्यमांवर कोरोनाच्या बाबतीत जातीय तेढ निर्माण करणे, अफवा पसरवून नागरिकांना चिथावणे, असे प्रकार काही गुन्हेगार व समाजकंटक करत असल्याने त्यांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉकवर व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले असून ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .ऑडिओ क्लिप्स, युट्युबचा गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्ह्या प्रकरणी आतापर्यंत २३९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या ३३ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील एका आरोपीने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर पीडित तक्रारदार हा कोरोनाबाधित रुग्ण आहे,अशा आशयाचा चुकीचा मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे तक्रारदाराला कुठलाही आजार नसताना त्याची सामाजिक बदनामी करुन मानसिक त्रास दिल्याने पोलिसांनी पोस्ट शेअर करणाऱ्यावर गुन्हा नोंदविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details