महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' मौलानाची एटीएसने केली तब्बल ४ तास चौकशी - MALAD

सूत्रांच्या माहितीनुसार या मौलानाच्या मोबाईलशी संबंधित काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्याने एटीएसच्या चारकोप युनिटकडून मौलानाची चोकशी करण्यात आली.

मौलानाची एटीएसने केली तब्बल ४ तास चौकशी

By

Published : Apr 24, 2019, 4:27 PM IST

मुंबई- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून(एटीएस) मुंबईतील मालाड मालवणी परिसरातील एका मदरशाच्या मौलानाची तब्बल ४ तास चौकशी करण्यात आली. एटीएस विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार या मौलानाच्या मोबाईलशी संबंधित काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्याने एटीएसच्या चारकोप युनिटकडून सकाळी संबंधित मदरशाच्या मौलनाला बोलवण्यात आले होते.

मौलानाची एटीएसने केली तब्बल ४ तास चौकशी

या वेळी या मौलानाकडून त्याचे आधारकार्ड, पासपोर्ट, पॅन कार्डसह इतर गोष्टी तपासण्यात आले. तब्बल चार तासांनी सर्व गोष्टींची खात्री पटल्यावर या मौलानाला पोलिसांनी घरी जाऊ दिले.

दरम्यान, देशात निवडणुकांचे वातावरण असून पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे. मौलानाची झालेली चौकशी हा रुटीन चेकअपचा भाग असल्याचे एटीएस सुत्रांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details