मुंबई - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. लोकसभेच्या १७ जागांसाठी आज मतदान झाले. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात एकूण ५७.३२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ६१.३१ टक्के मतदान नंदुरबार लोकसभा मतदारसंघात, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी ४५.२८ टक्के मतदान झाले आहे. आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र, कुणाचा विजय होणार? हे २३ मे'लाच ठरणार आहे.
लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये आज शेवटच्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, शिरूर आणि शिर्डी अशा १७ मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ७ जागांसाठी मतदान झाले होते. १९ एप्रिलला राज्यातील १० जागांसाठी मतदान झाले होते, तर २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६०.६८ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात, तर सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झाले.
राज्यात चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी -
- नंदुरबार - ६१.३१ टक्के
- धुळे - ५६.६८ टक्के
- दिंडोरी - ६५.७६ टक्के
- नाशिक - ४९.४३ टक्के
- शिरूर - ५९.४० टक्के
- शिर्डी - ६४.५३ टक्के
- मावळ - ५९.४९ टक्के
- पालघर - ६३.७२ टक्के
- भिवंडी - ५३.०७ टक्के
- कल्याण - ४५.२८ टक्के
- ठाणे - ४९.२१ टक्के
- मुंबई उत्तर - ६० टक्के
- मुंबई वायव्य - ५४.२३ टक्के
- मुंबई ईशान्य - ५६.८५ टक्के
- मुंबई उत्तर मध्य - ५३.६४ टक्के
- मुंबई दक्षिण मध्य - ५५.२३ टक्के
- मुंबई दक्षिण - ५१.४६ टक्के
चौथ्या टप्प्यातील 'या' आहेत प्रमुख लढती -
- मावळ लोकसभा मतदारसंघ -शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यामान खासदार श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान होते. यामध्ये आता बारणे बाजी मारणार की नवखे पार्थ पवार त्यांना चितपट करत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- शिरुर लोकसभा मतदारसंघ - युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे चौथ्यांदा रिंगणात उतरले होते, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले होते. अमोल कोल्हेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आढळराव पाटलांसमोर राष्ट्रवादीने मोठे आव्हान निर्माण केले होते. यावेळी आढळराव पाटील चौकार मारणार की अमोल कोल्हे त्यांना क्लिन बोल्ड करत दिल्ली गाठणार हा येणारा काळच ठरवेल.
- शिर्डी लोकसभा मतदारसंघ - शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगली होती. यावेळी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, तर काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी निवडणूक लढवली. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने रंगत निर्माण झाली आहे.
- धुळे लोकसभा मतदारसंघ - या मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना रिंगणात उतरवले होते. काँग्रेसकडून उमेदवार कुणाल पाटील यांनी लढवली. मात्र, त्यांच्यासमोर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंचे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.
- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ - या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. कारण काँग्रसेने येथून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले होते. तर त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे मोठे आव्हान होते. आता मतदार बॉलीवूडच्या जगतातील व्यक्तीला आपला खासदार बनवणार, की शेट्टींना दिल्लीत पाठवणार? हे तर २३ मे'लाच ठरणार आहे.
- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ -मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा काँग्रसेचा गड मानला जातो. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव करत हा गड काबीज केला होता. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपकडून पूनम महाजन आणि काँग्रेसकडून प्रिया दत्त या आमने-सामने उभ्या ठाकल्या होत्या. मात्र, यावेळी महाजन जिंकणार की दत्त हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ - शिवसेनेचे विद्यामान खासदार अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत रंगली होती. २०१४ च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव केला होता. मात्र, आता कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
राज्यात आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी -
- राज्यातील १७ मतदारसंघात ५ वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी
- नंदुरबार - ६२.४४ टक्के
- धुळे - ५०.९७ टक्के
- दिंडोरी - ५८.२० टक्के
- नाशिक - ५३.०९ टक्के
- शिरूर - ५२.४५ टक्के
- शिर्डी - ५६.१९ टक्के
- मावळ - ५२.७४ टक्के
- पालघर - ५७.६० टक्के
- भिवंडी - ४८.९० टक्के
- कल्याण - ४१.६४ टक्के
- ठाणे - ४६.४२ टक्के
- मुंबई उत्तर - ५४.७२ टक्के
- मुंबई वायव्य - ५०.४४ टक्के
- मुंबई ईशान्य - ५२.३० टक्के
- मुंबई उत्तर मध्य - ४९.४९ टक्के
- मुंबई दक्षिण मध्य - ५१.५३ टक्के
- मुंबई दक्षिण - ४८.२३ टक्के
- राज्यातील १७ मतदारसंघात ३ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
- नंदुरबार - ५१.९६ टक्के
- धुळे - ४०.६३ टक्के
- दिंडोरी - ४६.१३ टक्के
- नाशिक - ४१.७२ टक्के
- शिरूर - ४१.४८ टक्के
- शिर्डी - ४५.४८ टक्के
- मावळ - ४२.३२ टक्के
- पालघर - ४६.७७ टक्के
- भिवंडी - ३९.३५ टक्के
- कल्याण - ३३.७७ टक्के
- ठाणे - ३८.५२ टक्के
- मुंबई उत्तर - ४६.६५ टक्के
- मुंबई वायव्य - ४०.५३ टक्के
- मुंबई ईशान्य - ४३.१२ टक्के
- मुंबई उत्तर मध्य - ३९.४४ टक्के
- मुंबई दक्षिण मध्य - ४१.०९ टक्के
- मुंबई दक्षिण - ३८.७६ टक्के
- दुपारी १ वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
- धुळे - ३१.०८ टक्के
- नाशिक - ३०.८६ टक्के
- शिरूर - ३२.०५ टक्के
- मावळ - ३१.८७ टक्के
- नंदुरबार - ४०.०५ टक्के
- ठाणे - २०.६३ टक्के
- दिंडोरी - ३५.६९ टक्के
- शिर्डी - ३२.०५ टक्के
- कल्याण - २५.३१ टक्के
- पालघर - ३६.१६ टक्के
- भिवंडी - ३०.३० टक्के
- मुंबई उत्तर - ३२.९३ टक्के
- मुंबई वायव्य - २९.८७ टक्के
- मुंबई ईशान्य - ३२.३७ टक्के
- मुंबई उत्तर मध्य - २८.५९ टक्के
- मुंबई दक्षिण मध्य - ३०.०२ टक्के
- मुंबई दक्षिण - २८.२३ टक्के
- 1.15 - नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार
- 12. 55 - शिर्डी मतदार संघातील भोजदरी गावाअंतर्गत येणाऱ्या पेमरेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. रस्ते, पाणी या मुलभुत सुविधा नसल्यानं संतप्त ग्रामस्थांचा निर्णय
- सकाळी ११ पर्यंतची मतदानाची टक्केवारी
- धुळे - १७.७५ टक्के
- नाशिक - ७७.२२ टक्के
- शिरूर - १८.६५ टक्के
- मावळ - १८.२३ टक्के
- नंदुरबार - २४.५९ टक्के
- ठाणे - १७.४३ टक्के
- दिंडोरी - २१.०६ टक्के
- शिर्डी - २०.५५ टक्के
- कल्याण - १३.९१ टक्के
- पालघर - २१.४६ टक्के
- भिवंडी - १७.२५ टक्के
- मुंबई उत्तर - १९.४६ टक्के
- मुंबई वायव्य - १७.६४ टक्के
- मुंबई ईशान्य - १८.३९ टक्के
- मुंबई उत्तर मध्य - १६.२१ टक्के
- मुंबई दक्षिण मध्य - १६.८० टक्के
- मुंबई दक्षिण - १५.५१ टक्के
- 10.45 - माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जोर्वे येथे परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
- 10.40 -राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आणि पत्नी धनश्री विखे यांचे लोणी येथे कले मतदान
- 10.35 शिरुर लोकसभा मतदार संघात नारायणगाव येथे आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे तर लांडेवाडी येथे युतीचे आढळराव पाटील यांनी केलं मतदान
अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील - 10.30 -शिरुर लोकसभा मतदार संघात पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप यांची मतदान केंद्रांना भेटी सुरु. खेड तालुक्यातील मतदान केंद्रावर भेटी देत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी प्रशासन तयारीत.
- सकाळी 9 वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
- नंदुरबार - ८.७३ टक्के
- धुळे - ६.३१ टक्के
- दिंडोरी - ७.२८ टक्के
- नाशिक - ६.६९ टक्के
- शिरूर - ७.०७ टक्के
- शिर्डी - ७.२८ टक्के
- मावळ - ६.६७ टक्के
- पालघर ७.८६ टक्के
- भिवंडी - ६.२१ टक्के
- कल्याण - ५ टक्के
- ठाणे - ६.७७ टक्के
- मुंबई उत्तर - ७.८५ टक्के
- मुंबई वायव्य - ६.९० टक्के
- मुंबई ईशान्य - ७ टक्के
- मुंबई उत्तर मध्य - ५.९८ टक्के
- मुंबई दक्षिण मध्य - ६. ४५ टक्के
- मुंबई दक्षिण - ५. ९१ टक्के
- 2 तासात नाशिक मतदार संघात 6.69 टक्के मतदान
- 9.00 - शिरुर मतदार संघात पहिल्या 2 तासात 7.07 टक्के मतदान झाले.
- 8.25 - नाशिक मतदारसंघामध्ये मतदार यादीत नावे सापडत नसल्यानं मतदारांची तारांबळ, उत्साही मतदारांची निराशा.
- 8.12 - राजगुरुनगर येथील थिगळस्थळ प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड. मशिन रिसेट करताना अडचण येत होती. बिघाड दुरुस्त करुन मतदानाला पुन्हा सुरुवात.
- 7.40 - नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील 309 क्रमांकाच्या बर्डीपाडा केंद्रावर ईव्हीएम मशीन काम करत नसल्याने काही काळ मतदान बंद. प्रशासनाद्वारे ईव्हीएम मशीन बदलून मतदानाला सुरुवात करण्यात आली आहे.
- 7.00 - राज्यात 17 मतदार संघामध्ये सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात.