मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक ( former minister Nawab Malik ) यांच्या खाजगी रुग्णालयातील मुक्काम 13 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. यांच्या तपासाकरिता विशेष पथक स्थापन करण्यात यावे याकरिता मागणी करण्यात आले होते. यानंतर न्यायाधीश राहुल रोकडे ( Justice Rahul Rokde ) यांनी जेजे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून नवाब मलिक यांची तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तज्ञ डॉक्टरांना न्यायालयाचा निर्णय सांगण्यास विलंब झाल्याने नवाब मलिक यांचा 13 डिसेंबर पर्यंत खाजगी रुग्णालयातील मुक्काम आज सत्र न्यायालयाने वाढवला आहे. या प्रकरणावर पुढील सोडणे 13 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
सिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू : नवाब मलिक त्यांच्या किडनीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगी नंतर गेल्या तीन-चार महिन्यांपासून नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील सिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याला डीडीच्यावतीने विरोध करण्यात आला असून मलिक यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची उपचाराची गरज नाही. मलिक यांच्या प्रकृतीची चाचणी करण्याकरिता एक विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र देखील मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आले होते. यावर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यापूर्वी न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जे जे रुग्णालयातील एका तज्ञ डॉक्टरांकडून नवाब मलिक यांची तपासणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. याला नबाब मलिक यांच्यावतीने देखील मान्यता देण्यात आली होती.