मुंबई - दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाची हरित लवादाकडील याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली. अनिल परब यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला. साई रिसॉर्टशी माझा संबंध नाही असे मी सातत्याने सांगत होतो. मात्र मला दोन वर्ष बदनाम करण्यात आले. आता प्रकरण अंगलट येणार असे, लक्षात येताच माघार घेतली. सोमय्यांनी पळवाट काढली असली तरी एकवेळ नाक घासून माफी त्यांना मागावीच लागेल किंवा शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा द्यावा लागेल, असे परब म्हणाले.
साई रिसॉर्टशी माझा संबंध नाही असे मी सातत्याने सांगत होतो. मात्र मला दोन वर्ष बदनाम करण्यात आले. आता प्रकरण अंगलट येणार असे, लक्षात येताच माघार घेतली. सोमय्यांनी पळवाट काढली असली तरी एकवेळ नाक घासून माफी त्यांना मागावीच लागेल किंवा शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा द्यावा लागेल - अनिल परब, माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे नेते
काय होते आरोप - दापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहे. विनापरवाना रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्यात आले आहे. तसेच रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. आघाडी सरकार असताना हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले होते. हरित लवादाकडेही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. हरित लवादाने यात तथ्य नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली. मात्र किरीट सोमय्या यांनी सातत्याने राजकीय हेतूने बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जात असल्याचा आरोप करत बदनामी केली. हरित लवादाने हे प्रकरण आता रद्द केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रकरण अंगलट येईल या भीतीने पळवाट काढून माघार घेतल्याचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे.
दापोलीचे साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट आधीच आयकर आणि ईडीने जप्त केले आहेत. सरकारने रिसोर्ट पाडण्याचे आदेशही दिले आहेत. अनिल परब जामिनावर तसेच सदानंद कदम जेलमध्ये आहेत. आम्ही रिसोर्टच्या पाडकामासाठी NGT मध्ये गेले होतो. ज्याच्या विरोधात अनिल परब आणि कदम यांनी हायकोर्टात अपील दाखल केले. कायदेशीर तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून आता NGT हरित लवादाकडे सुनावणी होऊ शकत नाही, सुनावणी हायकोर्टात होईल - किरीट सोमय्या, भाजप नेते
अनिल परब आक्रमक - साई रिसॉर्टशी माझा काही संबंध नव्हता. मला आणि सदानंद कदम यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले. सगळीकडे खोट्या याचिका दाखल केल्या. सत्र न्यायालयात संबंधित प्रकरण असताना हरित लवादाकडे याचिका दाखल कशाला करायची, असा सवाल परब यांनी उपस्थित केला. सर्व तपास यंत्रणांनी, सत्र न्यायालयाने संबंधित प्रकरणाबाबत गुन्हा रद्द केला आहे. सर्व आरोप राजकीय उद्देशाने करण्यात आले आहेत. ते रद्द व्हावे त्यासाठी आम्ही पुन्हा न्यायालयात गेलो आहे. आता प्रकरण अंगलट येते म्हणून सोमय्यांनी माघार घेतली असली तरी न्यायालयातील प्रकरणही मागे घ्यावे लागेल. एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटींचा दावा द्यावा लागणार आहे, अशा शब्दांत परब यांनी फटकारले.
राणेंवर निशाणा - पुण्यातील लोकसभेच्या रिक्त जागेवर पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या जागेवर दावा करत आहेत. परब यांना या संदर्भात विचारले असता, पुण्यातील जागेवर आम्ही अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, असे परब म्हणाले. नितेश राणेंच्या आरोपांचीही हवा काढून टाकली. राणेंनी स्वतःच्या भवितव्याचा विचार करावा. आजवर किती घड्याळ आणि हात बदलले हे सर्वज्ञात असल्याचा खोचक टोला लगावला.
हेही वाचा -
- Sai Resort Case : अनिल परब यांच्याविरोधातली साई रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडची याचिका मागे, किरीट सोमय्या यांचा निर्णय
- Sai Resort case : सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या कोठडीत 2 जूनपर्यंत वाढ
- Sai Resort Construction Case: दापोली येथील 'साई रिसॉर्ट' बांधकाम प्रकरण; आरोप पत्रातून माजी मंत्री अनिल परबांचे नाव वगळले