मुंबई- धारावी शाहूनगर येथील वसाहत एका वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत आहे. येथे असणाऱ्या इमारतीच्या भिंतींवर परदेशी कलाकारांनी रेखाटलेली महाकाय चित्रे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. चार मजली असलेल्या या इमारतींच्या भिंतींवर काढलेली ही छायाचित्रे जणू आपल्याशी बोलतातच असा भास होत आहे.
धारावीमधील इमारतींवर परदेशी कलाकारांनी रेखाटली महाकाय चित्रे; बघ्यांची गर्दी
धारावी ही विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. आता त्यात या 40 फुटी भिंतीचित्रांची भर पडली आहे. अमेरिका मॅक्सीको येथील कलाकारांनी धारावीचे रुपडे पलटावे यासाठी 35 इमारतींवर चित्र काढले आहेत.
धारावी ही विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. आता त्यात या 40 फुटी भिंतीचित्रांची भर पडली आहे. अमेरिका मॅक्सीको येथील कलाकारांनी धारावीचे रुपडे पलटावे यासाठी 35 इमारतींवर चित्र काढले आहेत. धारावीतील सामान्य जनजीवन, तेथील दैनंदिन दिनचर्या, लहान मुलांचे खेळ, कुंभार काम अशी भली मोठी चित्रे येथील इमारतींवर काढण्यात आली आहेत. यामुळे हा परिसर सुशोभित झाला आहे.
या सूंदर कलाकृतीमुळे आमच्या परिसराची ओळख बदलली आहे. दुरवरून लोक या इमारतीच्या भिंती पाहण्यासाठी येत आहेत. या कलाकृती बघितल्या तर दिवस प्रसन्न जातो असे रहिवाशी नरेश सांगवी यांनी सांगितले.