महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परदेशी पर्यटकांनी घेतला होळीचा आनंद - Holi

देशभरात आज रंगपंचमीचा आनंद ओसंडून वाहत आहे. उत्सवाची नगरी म्हणूनही ओळख असलेल्या मुंबईतही परदेशी पाहुण्यांनी रंगपंचमीचा आनंद घेतला.

परदेशी पर्यटकांनी घेतला होळीचा आनंद

By

Published : Mar 21, 2019, 6:52 PM IST

मुंबई- देशभरात आज रंगपंचमीचा आनंद ओसंडून वाहत आहे. उत्सवाची नगरी म्हणूनही ओळख असलेल्या मुंबईतही परदेशी पाहुण्यांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. होळीला शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा असतो. या सणाचा अनुभव घेण्यासाठी परदेशी पाहुणे शिवाजी पार्कमवर आले होते.

हा सण अतिशय ऊर्जेचा असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडहून आलेल्या फ्रेडीक यांनी दिली. भारतात असा उत्सव असतो, याची आम्हाला कल्पना होती, पण एवढा उत्साह आणि ऊर्जा तरुणांमध्ये दिसतेय, खरच हे अद्भुत असल्याचे स्टीफन यांनी सांगितले.

परदेशी पर्यटकांनी घेतला होळीचा आनंद

आमच्या देशात परतल्यावर या सणाचा आनंद आम्ही आमच्या मित्रमंडळींमध्ये नक्कीच शेअर करू, असेही त्यांनी सांगितले. मुंबई शहरात सर्वत्र रंगपंचमीचा उत्साह दिसून येत असून लहान थोर सर्व मंडळी रस्त्यावर येऊन रंगांत न्हावून निघत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details