महाराष्ट्र

maharashtra

मुंबई : कोविड लसीची फ्रँचायझी देतो सांगून डॉक्टरला 12 लाखाचा गंडा; एका विदेशी नागरिकासह दोघांना अटक

By

Published : Nov 25, 2021, 2:13 AM IST

कोरोना लसीच्या नावाखाली लुटमारीचे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई सायबर सेलने एका विदेशी नागरिकासह अन्य 2 जणांच्या बनावट कंपनीचा पर्दाफाश केला आहे.

foreign national defrauded Mumbais doctor
foreign national defrauded Mumbais doctor

मुंबई -संपूर्ण देशात कोरोना लसीच्या नावाखाली लुटमारीचे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई सायबर सेलने एका विदेशी नागरिकासह अन्य 2 जणांच्या बनावट कंपनीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 10 मोबाईल, 3 सिम कार्ड, 1 पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया

डॉक्टरची 12 लाखांनी फसवणूक -

सायबर गुन्हे शाखेनुसार कोविड 19 लसीसाठी कच्चा माल पुरविण्याच्या नावाखाली एका विदेशी नागरिकाला 12 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने एका भारतीय डॉक्टरला सांगितले की त्यांना फिझॉन डायजेस्ट या कंपनीसाठी भारतातून कच्चा माल खरेदी करण्यासाठी एजंटची आवश्यकता आहे. लंडनमध्ये त्यांची एक कंपनी आहे, जी एक प्रतिष्ठित औषध निर्माता कंपनी आहे. जे कोविड 19 साठी लस बनवते. आम्ही कंपनीची फ्रँचायझी भारतात देईल आणि कमिशनही देईल. त्यानंतर डॉक्टरने त्याला 12 लाख रुपये दिले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास डॉक्टरने सायबर सेलकडे तक्रार नोंदवून नायजेरियन नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे.

हेही वाचा - ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परिवहनमंत्र्यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details