मुंबई - शहरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कोरोना योद्धा, निवासी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांना दररोज मोफत जेवण ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून दिले जात आहे. 23 मेपर्यंत म्हणजे कालपर्यंत जेवण पुरवण्याची मुदत होती. यानंतर जेवणाची व्यवस्था रुग्णालयाने करावी, असे ताजकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयासमोर जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार होता. मात्र ताजनेच हा प्रश्न आता सोडवला आहे. जेवण पुरवण्याची मुदत त्यांनी 31 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे डॉक्टरांची जेवणाची चिंता मिटली आहे.
पालिका रुग्णालयात फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढत आहेत. या निवासी डॉक्टरांची जेवणाची सोय मेस, कँटीनमध्ये असते. काही जणांना घरून डबा येतो. पण कोरोनामुळे मुंबईत 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि मेस, कँटिन, हॉटेल सगळे काही बंद करण्यात आले. त्यात निवासी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना रुग्णालयातच, हॉस्टेलमध्ये वा हॉटेलमध्ये क्वारंटाइन पध्दतीनेच रहावे लागत आहे. अशावेळी या निवासी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ताज ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला.
ताजने सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज जेवण देण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांचा जेवणाचा मोठा प्रश्न सुटला. पण त्यांनी दिलेली वेळ संपली. तेव्हा ताजने सर्व रुग्णालयाच्या अधिष्ठात्याना जेवणाची व्यवस्था आपली आपण करावी, असे कळवले होते. त्यामुळे रुग्णालय आणि निवासी डॉक्टरांची चिंता वाढली होती. पण, आता ताजनेच लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे 31 मेपर्यंत जेवण पुरवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे डॉक्टराच्या जेवणाची चिंता मिटली आहे. दरम्यान, लॉकडाऊन पुढे वाढल्यानंतरही ही सेवा सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ताज ट्रस्टने निवासी डॉक्टरांच्या जेवणाचा प्रश्न सोडवला, 31 मेपर्यंत पुरवणार सुविधा - mumbai latest news in marathi
ताजने सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज जेवण देण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांचा जेवणाचा मोठा प्रश्न सुटला. पण त्यांनी दिलेली वेळ संपली. तेव्हा ताजने सर्व रुग्णालयाच्या अधिष्ठात्याना जेवणाची व्यवस्था आपली आपण करावी, असे कळवले होते. त्यामुळे रुग्णालय आणि निवासी डॉक्टरांची चिंता वाढली होती. पण, आता ताजनेच लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे 31 मेपर्यंत जेवण पुरवणार असल्याचे जाहीर केले आहे.
ताज ट्रस्टने निवासी डॉक्टरांच्या जेवणाचा प्रश्न सोडवला, 31 मेपर्यंत जेवण पुरवणार