मुंबई- राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करूनही ४ महिने उलटले. मात्र, अद्यापही चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच मागवण्यात आले होते. आता गटातील १५ गावांमध्ये एक छावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या छावण्यांमधील जनावरांना आठवड्याला ३ किलो खाद्य दिले जात असल्याने जनावरे उपाशीच राहत आहेत, असा आरोप अहमदनगर कल्याणकारी दुध संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरेंनी केला आहे.
छावण्यांतील जनावरे उपाशी...! सरकारी छावणी धोरणाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे
छावण्यांतील जनावरे उपाशी...! सरकारी छावणी धोरणाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे..चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच मागवण्यात आले होते. आता गटातील १५ गावांमध्ये एक छावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या छावण्यांमधील जनावरांना आठवड्याला ३ किलो खाद्य दिले जात असल्याने जनावरे उपाशीच राहत आहेत,
गटात १० हजार जनावरे असताना सरकारने फक्त ५०० जनावरांची सोय केली आहे. छावणीत ५० टक्के कमी चारा मिळत आहेत. एका गाईला ३० किलो ओला चारा अन्यथा ८ किलो सुका चारा दिला पाहिजे. छावणीसाठी शेतकऱ्याला ५ जनावरांचे बंधन आहे. शेतकऱ्यांची १०-१५ जनावरे असली तर करायचे काय? असा प्रश्न उपस्थित करत छावणीवरील माणसाला २५० रुपये रोज द्यावा लागतो, असेही डेरेंनी नमूद केले.
सध्या ग्रामीण भागात पाण्याची तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांना ओला चारा तर सोडाच, पण कोरडा चारा मिळणेही कठीण आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या चारा टंचाईने त्रस्त झाले आहेत. जनावरे कशी जगवावीत, अशा विवंचनेत शेतकरी अडकले आहेत. सरकारने दावणीला चारा देण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, दावणीला तर सोडाच, पण चारा छावणीही सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे कठीण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.