मुंबई -कुर्ला रेल्वे स्थानकावर लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबत विक्रेत्याच्या स्टॉलला टाळे ठोकले होते. या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास नुकसान पोहोचविणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या विक्रेत्याला पाच लाखांचा दंड रेल्वे प्रशासनातर्फे ठोठावण्यात आला आहे.
तपासणीअंती या लिंबू सरबतामुळे प्रवाशांना न्युमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच ई-कोलाय हे जीवाणू जास्त प्रमाणात आढळून आले. प्रवाशांमध्ये ताण वाढणे, अतिसार इत्यादी समस्या होऊ शकतात. त्यामुळे विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबतासह इतर सरबते बंद केली. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार घडल्याने प्रवासी आणि रेल्वे स्टॉल धारकांचे मोठे नुकसान झाले होते. मध्य रेल्वेच्या सर्वच स्टॉल वरील शीतपेयांवर बंधी घालण्यात आली होती.
रेल्वे स्थानकांवर पॅकिंग शीतपेयाची मागणी वाढली