मुंबई:घटनेतीलआरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले गेले. पहिली कारवाई गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात तर दुसरी माहीम पश्चिम येथील कासा लुना बिल्डिंग जवळ करण्यात आली आहे. तिसरी कारवाई माहीम पश्चिममध्ये लिंक रोडवर करण्यात आली आहे.
वरळी, घाटकोपर युनिटची कारवाई: 28 एप्रिलला मुंबई शहरात विविध ठिकाणी छापे टाकत अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे धडक कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत वरळी युनिटने १९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) सह गोरेगांव पूर्व याठिकाणी अंदाजे २६ वर्षे व २८ वर्षे वर्षांच्या दोन इसमांना अटक केली. ड्रगची किंमत १५ लाख रुपये आहे. याच दिवशी दुसऱ्या घटनेत घाटकोपर युनिटने माहिम पश्चिम भागातून एका युवकाला (24 वर्षे) ६८ ग्रॅम एम.डी. ड्रगसह अटक केली. त्याच्या जवळून अंदाजे १३ लाख ६० हजार किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या दोन्ही गुन्ह्यात आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. एक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
बांद्रा युनिटची कारवाई: तिसऱ्या कारवाईत बांद्रा युनिटने 28 एप्रिलला सायन माहिम लिंक रोड भागात दोन व्यक्तींना (२१ वर्षे व २८ वर्षे) ताब्यात घेतले. पोलीस झडतीत त्यांच्याकडे एकूण ५२ ग्रॅम वजनाचे 'एम.डी.' ड्रग (अंदाजे किं. १० लाख) आढळून आले. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या कारवाईने ड्रग तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
ड्रग तस्कारांनी अटक: मुंबईत यापूर्वीही ड्रग तस्कारांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन आफ्रिकन तरुणांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने शिवाजीनगर, मुंबई परिसरामधून शिताफीने अटक केली. दोन आरोपींकडून ११६ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत रुपये २३ लाख २० हजार होती. एक आरोपी 27 वर्षांचा असून दुसरा आरोपी 37 वर्षांचा आहे.
हेही वाचा:Ajit Pawar On Barsu Refinery : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा फेरविचार करण्याची गरज- अजित पवार