मुंबई- रविवारी रात्रीच्या वेळी मुंबईत रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायन, धारावी, दादर, माटुंगा या सारख्या बहुतांश भागात पाऊस पडला आहे. रविवारी सायंकाळपासूनच काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रिमझिम पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा या मौसमातला पहिला पाऊस असून नागरिक घराबाहेर पडून याचा आनंद घेत होते.
मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी; उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा - ENJOY
रिमझिम पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा या मौसमातला पहिला पाऊस असून नागरिक घराबाहेर पडून याचा आनंद घेत होते.
मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी
पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर सध्या सुखद गारवा अनुभवत आहेत. वातावरणातील शुष्क आणि कोरडेपणा गेल्यामुळे तापमानातही बराच फरक झालेला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबईत चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर आत्ता यावर्षी मुंबईत थोडा लेट का होईना पण पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईकर पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचे चित्र पाहायला मिळत होते.