मुंबई- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारार्थ चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्ग येथे जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी चेंबूर व आसपासच्या परिसरातील काँग्रेस आणि मित्र पक्षाचे लोक मोठया संख्येने उपस्थित होते.
एकनाथ गायकवाड यांच्या प्रचार मेळाव्यास कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद - Mumbai
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारार्थ चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्ग येथे जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
मेळाव्यावेळी सभागृह पूर्णपणे भरले होते. यावेळी भाषणात कोणी मोदींच्या नावाचा उल्लेख केला की, चौकीदार चोर है, अशा घोषणा ऐकायला मिळत होत्या.
कोणत्याही परस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले पाहिजे. सर्वांनी प्रचाराच्या कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना नवाब मलिक यांनी सांगितले. संजय निरुपम यांनी आपल्या कडक शैलीत भाषण करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार किरण पावसकर, आमदार वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केली. मेळाव्यापुर्वी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.