मुंबई : गोरेगाव पूर्व येथील धीरज व्हॅली ( fire broke out Dheeraj Valley building ) इमारत क्रमांक दोनच्या सातव्या मजल्यावर सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ( Seventh Floor fire case ) आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ४० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन ( Firefighters control fire in Goregaon ) विभागाकडून देण्यात आली.
Fire in Goregaon गोरेगावमध्ये धीरज व्हॅली इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, कोणीही जखमी नाही - Fire in Goregaon
गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावर गोकुळ धाम जवळ धीरज व्हॅली ( emergency management department ) इमारत क्रमांक २ ही इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
सातव्या मजल्यावर आगगोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावर गोकुळ धाम जवळ धीरज व्हॅली ( emergency management department ) इमारत क्रमांक २ ही इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी चार फायर इंजिन आणि व तीन वॉटर टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. रात्री १० वाजून ७ मिनिटांनी म्हणजेच सुमारे ४० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
कोणीही जखमी नाहीआगीमुळे सातव्या मजल्यावरील रूम नंबर ७०१ आणि ७०२ मधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, फॉल्स सिलिंग, बेड, टेबल, खुर्च्या, बेड, घरगुती वस्तू जळून खाक झाल्या. आग लागल्यावर इमारतीमधील सर्व रहिवाशी सुखरूप बाहेर आले असल्याने आगीत कोणीही जखमी झालेले नाही. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. ही आग का लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.