महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire incidents on Laxmi Pujan: दिवाळीच्या दिवशी मुंबईत तीन ठिकाणी आगीच्या घटना, फटाके ठरले आगीचे कारण - दिवाळी आग घटना

Fire incidents on Laxmi Pujan दिवाळीच्या दिवशी फटाके लावल्यानं मुंबईत काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवानं, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Fire incidents on Laxmi Pujan
Fire incidents on Laxmi Pujan

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 9:06 AM IST

मुंबईFire incidents on Laxmi Pujan : दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याचा आनंद आपल्या जीवावर बेतण्याचीदेखील शक्यता असते. निष्काळजीपणानं लावलेल्या फटाक्यांमुळे अनेकदा आग लागण्याची शक्यता असते. याच फटाक्यांमुळे मुंबईत विविध ठिकाणी रविवारी आगीच्या घटना घडल्या आहेत.

कुर्ला नेहरू नगर-कुर्ला पूर्व येथील नेहरु नगर जवळील अभ्युदय बँक इमारतीत रविवारी आगीची घटना घडली. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी रात्री साडेदहा वाजता आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार, अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग प्रकार एकमधील असून सौम्य प्रकारात याचे वर्गीकरण केले जाते.

जोगेश्वरी पश्चिम-जोगेश्वरी पश्चिम येथील रेड वूड या 15 मजली इमारतीच्या बी विंग मधील 13व्या माल्यावरील खोली नंबर 1301 च्या बाल्कनीत आग लागली. रविवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. या आगीचे कारण फटाके असल्याची नोंद करण्यात आली आहे. फटाक्यांमुळे शिलाई मशीन आणि लाकडी फर्निचरला लागलेली ही आग अग्निशमन दलाने 10-15 मिनिटांत तातडीने विझवली. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. बाल्कनीत किंवा उंच इमारतींच्या छतावर फटाके वाजवणे किती धोकादायक आहे, हे या घटनेने अधोरेखित झाले. उंच इमारतीवर फटका फोडल्यानं आग पसरण्याचा धोका वाढतो.



मुंबई सेंट्रल-रविवारी पहाटे 3.19 वाजता मुंबई सेंट्रल येथील स्टेट ट्रान्सपोर्ट डेपो कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. इलेक्ट्रिकल वायरिंग, इन्स्टॉलेशन, ऑफिसच्या फाईल्स आणि लाकडी फर्निचरला लागलेली ही आग दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझवण्यात आली. 29 वर्षीय फायरमन रमेश महाले हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना नायर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात इतर किरकोळ आगीच्या घटनाही नोंदवण्यात आल्या होत्या, परंतु मुंबई अग्निशमन दलाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली आहे. असे असले तरी नागरिकांनी फटाके वाजवताना काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशामन विभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा-

  1. Diwali 2023 : साई मंदिरात जल्लोषात पार पडलं लक्ष्मीपूजन, साई मूर्तीला चार कोटींचे दागिने
  2. Pune Fire : फटाके फोडताना घ्या काळजी! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात 23 ठिकाणी आगीच्या घटना

ABOUT THE AUTHOR

...view details