महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंधेरी मरोळ येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग, दोन गाळे जळून खाक, एक अधिकारी जखमी - marol industrial estate latest news

अंधेरी पूर्व मरोळ उद्योग सोसायटी मधील नंदन इंडस्ट्रीयल इस्टेट येथे आग लागली होती. या आगीत दोन गाळे जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

fire
लागलेली आग

By

Published : Jun 25, 2020, 8:51 AM IST

मुंबई- येथील अंधेरी पूर्व मरोळ उद्योग सोसायटी मधील नंदन इंडस्ट्रीयल इस्टेट येथे रात्री 12 वाजून 49 मिनिटाला आग लागली होती. या आगीत दोन गाळे जळून खाक झाले आहेत. या आगीवर पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले.

इंडस्ट्रीयल इस्टेट मधील दोन गाळ्यांना रात्री 12 वाजून 49 मिनिटांनी आग लागली होती. त्यातील एका गाळ्यात मेट्रो लॅबरोटरीजचे काम चालत होते. तर दुसऱ्या गाळ्यात प्लास्टिकचे काम चालत होते. आग इतकी भीषण होती की या आगीत दोन्ही गाळे जळून खाक झाले आहेत.

प्लास्टिक जळत असल्याने मोठ्य़ा प्रमाणा धुर निघत होता. यामुळे आग विझवताना डेप्युटी फायर ऑफिसर घोष हे बेशुद्ध झाले. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर कोणीही जखमी नाहीस अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

दरम्यान, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारासनरिमन पॉईंट येथील जॉली मेकर चेंबर 2 इमारती मधील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या सर्व्हर रूमला आग लागली होती. यात बँकीतील सर्व साहित्य व कागदपत्र जळून खाक झाले आहेत. या आगीवर सकाळी 7 वाजता अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणली. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा -नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या 'सर्व्हर रुम'ला आग, आग नियंत्रणात

ABOUT THE AUTHOR

...view details