महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझगाव जीएसटी भवनला लागलेली आग आटोक्यात; उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी - Fire has broken out in GST Bhavan mumbai

माझगाव येथील जीएसटी भवनला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग विझवण्यात यश आले आहे.

mumbai
माझगाव येथील जीएसटी भवनला भीषण आग; उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल

By

Published : Feb 17, 2020, 1:42 PM IST

Updated : Feb 17, 2020, 4:10 PM IST

मुंबई- भायखळा परिसरातील माझगाव येथील जीएसटी बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

माझगाव येथील जीएसटी भवनला भीषण आग
जीएसटी भवनला भीषण आग

दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने यावेळी बिल्डिंगमध्ये कोणीही अडकलेले नव्हते. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ही आग का लागली याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री
Last Updated : Feb 17, 2020, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details