मुंबई - विक्रोळीतील टागोरनगर ग्रुप नंबर एकमध्ये बिर्याणीच्या दुकानात दुपारी १ च्या सुमारास स्वयंपाक करताना सिलेंडर लीक झाल्यामुळे आग लागली. यामध्ये दुकानाबाहेर असलेली रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही
विक्रोळीत सिलेंडर लीक झाल्याने लागलेल्या आगीत रिक्षा जळून खाक - mumbai
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावरील दृश्ये
आपला जीव वाचवण्यासाठी दुकानाच्या मालकाने लीक झालेला सिलेंडर पायाने ढकलला असता तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षावर जाऊन तो आदळला. सिलेंडरमधून गॅस बाहेर पडल्यामुळे आग लागली यामध्ये रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.