महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 7, 2021, 5:48 PM IST

Updated : Apr 7, 2021, 7:51 PM IST

ETV Bharat / state

कुर्ला परिसरातील भंगार दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण; दोन जण जखमी

कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रोडवरील गाड्यांच्या स्पेअर पार्टची दुकाने आहेत. या दुकानांना आज सायंकाळी आग लागली. सदर जागा कलेक्टरच्या अखत्यारीत असून त्याठिकाणी असलेल्या बांधकामांमुळे अग्निशमन दलाला पोहचण्यास उशीर झाला. यामुळे आग वाढली असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

आग
आग

मुंबई - कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रोडवरील गाड्यांच्या स्पेअर पार्टची दुकाने आहेत. या दुकानांना आज सायंकाळी आग लागली. सदर जागा कलेक्टरच्या अखत्यारीत असून त्याठिकाणी असलेल्या बांधकामांमुळे अग्निशमन दलाला पोहचण्यास उशीर झाला. यामुळे आग वाढली असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तर येथील नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी मिनी स्टेशन आणि रस्ते दुरुस्तीच्या कामाला लागणारा निधी पालिकेने द्यावा, अशी मागणी केली आहे.

दुकानांना आग -

कुर्ला सीएसटी रोडवरील गाड्यांच्या स्पेअर पार्टच्या दुकानांना आज सायंकाळी ४.१८ च्या दरम्यान आग लागली. ५ वाजून ६ मिनिटाच्या सुमारास या आगीची लेव्हल ३ वर गेली. आगीची माहिती मिळताच आणि आग वाढल्याने घटनस्थळी १३ फायर इंजिन, ११ जंबो वॉटर टँकर दाखल झाले. आग लागलेले ठिकाण दाटीवाटीच्या वस्तीमधील असल्याने त्याठिकाणी पोहचण्यास अग्निशमन दलाला पोहचण्यास उशीर झाल्याने आगीचे प्रमाण वाढले. मात्र अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले असून या आगीत दोन जण जखमी झाल्याची माहिती डॉ. सईदा खान यांनी दिली. जखमी झालेल्यापैकी एक जण स्थानिक नागरिक असून एक जण अग्निशमन दलाचा जवान आहे. या दोघांना कुर्ला भाभा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे खान यांनी सांगितले.

मिनी फायर स्टेशनला पालिकेकडे निधी नाही -

कुर्ला सीएसटी रोडच्या रुंदीकरणाची मागणी महापालिकेकडे करण्यात आली. तसेच मिनी फायर स्टेशन उभारावे म्हणून मागणी केली होती. या दोन्ही मागण्यांकडे पालिका दुर्लख करत आहे. मिनी फायर स्टेशन आणि रस्ते रुंद करण्यासाठी पालिकेकडे निधी नाही. आज रस्ते रुंद असते आणि मिनी फायर स्टेशन असते तर आगीच्या ठिकाणी अग्निशमन दल लवकर पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले असते असे डॉ. सईदा खान यांनी म्हटले आहे.

घटनास्थळ
कलेक्टर दुर्लक्ष करतात -

दरम्यान आगीच्या घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान कलेक्टरच्या जागेवर ही दुकाने आहेत. अग्निशमन दल वेळेवर पोहचले मात्र त्यांना आत जाता आले नाही. यामुळे आग पसरली. कलेक्टरच्या जमीनीवर ही बांधकामे आहेत. त्याबाबत बैठकही झाली आहे. त्यानंतरही कलेक्टर दुर्लक्ष करत आहेत असा आरोप महापौरांनी केला आहे. या विभागात मिनी फायर स्टेशनची मागणी होत आहे त्याप्रमाणे ते उभारले जाईल असे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा-अर्ध्यावरती डाव मोडला... संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन, आजच होतं लग्न

Last Updated : Apr 7, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details