महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील गॅरेजला आग, ६ आलिशान गाड्या जळून खाक - car burned
महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील एका कार सर्विस सेंटरला (गॅरेज) लागलेल्या आगीत ६ आलिशान गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
अग्निशमन दल आग विझवताना
मुंबई- महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील एका कार सर्विस सेंटरला (गॅरेज) लागलेल्या आगीत ६ आलिशान गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरु आहे.