महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire in Residency : भायखळा येथील ६ ते ७ झोपड्यांना आग; आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

भायखळा के के मार्ग लक्ष्मी रेसिडेन्सी ( KK Marg Lakshmi Residency ), तबेला नंबर २ येथील ६ ते ७ झोपड्यांना साडे अकराच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

Fire in Residency
झोपड्यांना आग

By

Published : Nov 14, 2022, 2:14 PM IST

मुंबई : भायखळा के के मार्ग लक्ष्मी रेसिडेन्सी ( KK Marg Lakshmi Residency ), तबेला नंबर २ येथील ६ ते ७ झोपड्यांना साडे अकराच्या सुमारास आग लागली. आग विजवण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून (Department of Emergency Management ) देण्यात आली आहे.

झोपड्यांना आग :भायखळा के के मार्ग लक्ष्मी रेसिडेन्सी, तबेला नंबर २ येथील ६ ते ७ झोपड्यांना साडे अकराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत विभागात काळाकुट्ट धूर पसरला होता. धुरामुळे येथील लोकांना श्वसनाचे त्रास होण्याची भीती असल्याने पावणे बाराच्या सुमारास ही आग लेव्हल २ ची घोषित करण्यात आली. ८ फायर इंजिन ७ वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मुंबईतील कुर्ला परिसरात घडली होती अशी घटना : काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरात एलबीएस रोडवर एका कॉम्प्युटर पार्ट्सच्या दुकानाला आग लागली होती. आगीमुळे संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने भरून गेला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, आग हळूहळू वाढत होती. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details