मुंबई: विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) कार्यालयाला आग लागल्याची घटना उघडकीस आली. कार्यालयात शनिवार सकाळी भीषण आग (Fire at LIC office building) लागली. आगीत एलआयसी कार्यालयाचा संपूर्ण मजला जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र महत्त्वाची कागदपत्रे जळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
Fire breaks in LIC office : सांताक्रूझ एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग - अग्निशमन दलाच्या गाड्या
मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील (In the Santa Cruz area of Mumbai) एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला (Fire at LIC office building) आग लागलागल्याची घटना समोर आली आहे.
एलआयसी कार्यालय
आग कोणत्या कारणामुळे लागली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची झळ दुसऱ्या मजल्यावरील बचत योजना विभाग, इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर, फाइल रेकॉर्ड, लाकडी फर्निचर पर्यंत पोहोचली. आगीत अनेक एलआयसी पॉलिसी होल्डर्स (ग्राहक) चे कागदपत्रही जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या (Fire trucks) दाखल झाल्या.
Last Updated : May 7, 2022, 1:41 PM IST