मुंबई -सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला नविन वळण लागले आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची बहिण प्रियंका सिंह यांच्यासह डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना, यामध्ये रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह व डॉ. तरुण कुमार यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी एनसीबी चौकशी संपवून थेट वांद्रे पोलीस ठाणे गाठले. जर सुशांतच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून माझ्या विरोधात गुन्हा दाखल होत असेल तर सुशांतची बहिण प्रियंका सिंह हिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून रिया चक्रवर्ती हिने वांद्रे पोलिसांकडे मागणी केलेली होती. त्यानुसार, वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये रिया चक्रवर्ती हिने दिलेल्या तक्रारी अर्जानंतर कलम 420, 464, 465, 466, 468, 474, 306 , 120 ब 34 आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर सदरचा गुन्हा सीबीआयकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आलेला आहे.