महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

FIR Against Udhayanidhi Stalin : सनातन धर्म वाद प्रकरण; तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिनवर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा

FIR Against Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. याप्रकरणी देशभरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल होत आहेत. आता मुंबईतील मिरा रोड पोलीस ठाण्यात उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR Against Udhayanidhi Stalin
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 8:04 AM IST

Updated : Sep 13, 2023, 8:18 AM IST

मुंबईFIR Against Udhayanidhi Stalin :सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर मुंबईतील मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे.

मिरा रोड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल :तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम 153 अ, 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन :तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह टीका केली होती. सनातन धर्म हा मच्छर, डेंग्यूसारखा आहे. त्यामुळे सनातन धर्म संपवला पाहिजे असं, वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं देशभरात खळबळ उडाली होती. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता मुंबईतही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं उदयनिधी स्टॅलिन यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी
  2. Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : सनातन धर्म संपुष्टात आणलाच पाहिजे, मी माझ्या विधानावर ठाम - उदयनिधी स्टॅलिन
Last Updated : Sep 13, 2023, 8:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details