मुंबई-हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा मोराणी ही कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळून आल्यामुळे तिला उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल आहे. यानंतर करीम मोराणी यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी केली असता स्वतः करीम मोराणी यांची कोरोना चाचणीही पॉजिटिव्ह आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चित्रपट निर्माते करीम मोराणी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल - कोरोना पॉजीटिव्ह
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.त्यामुळे ते राहत असलेली इमारत सील करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालया
चित्रपट निर्माते करीम मोराणी
करीम मोरानी जुहू परिसरातील शगुन या इमारतीत राहत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी जोया व शजा असे कुटुंब आहे. शजानंतर करीम मोराणीची दुसरी मुलगी जोया ही सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. करीम मोराणी यांच्या कुटुंबातील कोरोना रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे. दरम्यान, करीम मोराणी राहत असलेल्या शगुण इमारतीला सील करण्यात आली आहे. वैद्यकीय पथकाकडून इमारतीतील नागरिकांची तपासणी केली जात आहे.