मुंबई -जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने रुग्णालय प्रशासन आणि सरकारच्या गलथान कारभाराबद्दलची कथा एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
वाडिया रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराची कथा झाली एका कोरोना वॉरियरची व्यथा!
शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांवर दबाब आणत असल्याचा आरोप केला आहे.
रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांना काम करताना लागणारे मास्क, ग्लोवज् आणि इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाबरोबर वादविवाद केल्यानंतर हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. पीपीई कीट या कर्मचाऱ्यांना दिलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेली एक महिला कोरोना पोझिटिव्ह होती. तिच्या उपचारादरम्यान या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
जर कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळाले असते, तर मी कोरोनाच्या विळख्यात सापडले नसते, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे. या महिला कर्मचारी 2015 पासून वाडिया रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. आवश्यक साहित्य नसतानाही कर्मचाऱ्यांवर रुग्णालय प्रशासन दबाव आणून काम करवून घेत, असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला आहे.