मुंबई - आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलन करणार आहेत. शासकीय आश्वासनांची पूर्तता न झाल्याने थेट अधिवेशनात ते आपल्या विविध मागण्या मांडणार असल्याचे, आदमी पक्षाचे राज्याचे सहसंयोजक किशोर मांध्यान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
'आप'च्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी करणार नागपुरात आंदोलन - शेतकरी समस्या
राज्याचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार शासकीय आश्वासनांची पूर्तता न झाल्याने थेट हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा -काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा; पोलीस आणि आंदोलकांत रेटारेटी
किशोर म्हणाले, " आज देशात अशी परिस्थिती आहे की महिलांवर, शेतकऱ्यांवर, कामगारांवर, प्रत्येक नागरिकावर, सर्वांवरच अत्याचार होत आहेत. या अत्याचारांविरोधात दाद मागण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे" राज्याचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार आहे. या काळात राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले जाईल आणि काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.