मुंबई : महालक्ष्मी मंदिर मुंबई मधील एक सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अरब सागरा जवळच्या किनाऱ्यालगत महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील भुलाबाई देसाई मार्गावरती स्थित आहे. हे मंदिर लाखो लोकांचं विश्वासाचं आणि प्रार्थनेचं स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या अगदी जवळच आहे. या मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत. गर्भगृहामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन देवींच्या प्रतिमा एक साथ विराजमान आहेत. महालक्ष्मी देवीची प्रतिमा ही मधोमध आहे. तर महालक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला महाकाली व डाव्या बाजूला महासरस्वती मातेची प्रतिमा आहे.
मंदिराचे रहस्य :लक्ष्मी मंदिर हे मुंबईतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे गर्दी करतात. दिवसांमध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भक्त महालक्ष्मीची वास्तविक प्रतिमा नाही बघू शकत. असं म्हणतात ही, वास्तविक प्रतिमा पूर्ण दिवसभर एका आवरणाने झाकली जाते. प्रतिमा बघायची असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे. रात्री जवळपास साडे नऊ वाजल्यानंतर ह्या प्रतिमे वरून आवरण थोड्यावेळासाठी काढलं जातं. इथे रात्री उशिरापर्यंत श्रद्धाळूंची मोठ्या प्रमाणावर संख्या बघायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात एक भिंत आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तजन एक नाणं भिंतीवर चिटकवतात. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे नाणं भिंतीवर चिपकला देखील जातो. महालक्ष्मी मंदिर हे जागृत स्थान आहे, इथे येणाऱ्या सर्व भक्तांची इच्छा पूर्ण होते. मुंबई शहर हे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस मार्गांनी चांगल्या स्थितीत जोडलं गेलं आहे. बेस्टच्या बसेस तसेच खाजगी मुंबई दर्शनासाठी च्या बससेवा या मार्गावरून दररोज चालू असतात.
मंदिराचा इतिहास :मुंबई मधील वरळी आणि मलबार हिल ज्याला आपण आता कँडी ब्रिज असं म्हणतो, या ब्रिजला जोडणारी भिंत बनवण्याच्या वेळी एक अदभूत घटना घडली असं म्हटलं जातं. मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी ने मुंबई आणि वरळी ही दोन बेटे समुद्रात भरणी करून बांधण्याचा विचार केला. व्यापारी असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीनचा हा प्रयोग मंजूर नव्हता. मुंबई बेटाचा दक्षिण टोक जे सध्या महालक्ष्मी मंदिर म्हणून ओळखल जातं आणि समोरचं वरळी गाव म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचं लव्ह ग्रोव्ह उंदचन केंद्र किंवा अत्रीया मॉल आहे. तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरले होते. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी संपूर्ण भायखळा पर्यंत पोहोचायचं. त्यामुळे मुंबई बेटावरून वरळी कडे जायला होडी शिवाय दसरा पर्यायच नव्हता. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी जिथुन आत घुसायचे त्या भागाला द ग्रेट ब्रिच असं नाव दिलं होतं. म्हणूनच जॉन ने हि खाडी भरून काढण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई बेटावरून थेट वरळीला जाण्यासाठी एक गाडी मार्ग ब्रिज बनवायचं ठरवलं.
वरळी बांध : ह्या प्रकल्पाची सुरुवात त्याने इंग्लंड कार्यालयाच्या परवानगी शिवायच केली. तेव्हां या बांधकामाचं नाव वरळी बांध असं होतं. तेव्हा या कामाची सगळी सूत्रे रामजी शिवाजी यांच्या हाती होती. हे एक तरुण इंजिनियर होते. बांधकाम सुरू झालं आणि दगडांच्या राशीच्या राशी पाण्यात भरल्या गेल्या. पण थोडं बांधकाम चांगलं झालं की हा बांध समुद्राच्या रेट्याने घसरून पडत असे. असं बरेच महिने चालू राहील, परंतु रामजी आणि जॉन या दोघांनी हिम्मत नाही हरली. आणि त्यांनी हे काम चालूच ठेवलं तसं बघायला गेलं तर त्या वेळेच तंत्रज्ञान बघता हे काम थोडं अवघडच होतं. तेव्हा बांधकाम करणाऱ्यांना खूप काही संकट आली. ब्रिटिश इंजिनियरसचे पण खूप सारे प्रयत्न वाया गेले. तेव्हा प्रोजेक्टचे चीफ इंजिनियर म्हणजे रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात महालक्ष्मी देवीने दर्शन दिले. आणि ती म्हणाली वरळीच्या जवळच्या समुद्रामध्ये माझी एक मूर्ती आहे. ती काढून तुम्ही तिथे माझं मंदिर बनवा आणि पुढचे सगळे संकट दूर होतील. तेव्हा त्यांनी लक्ष्मीच्या आदेशानुसार शोध काम करायला सुरुवात केली. आणि त्यांना त्याच ठिकाणी महालक्ष्मी देवीची मूर्ती देखील सापडली. आणि या घटनेनंतर चीफ इंजिनियरने त्याच जागी एक छोटेसे मंदिर बांधले. नंतर ब्रिज निर्माण संबंधित कार्य देखील त्वरित पार पडलं गेलं. आज त्याच ठिकाणाला आपण मुंबईचे महालक्ष्मी मंदिर असं म्हणतो. अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भुलाबाई देसाई मार्गावर समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित आहे. मंदिरात चे निर्माते एक व्यापारी धाकजी दादाची होते. ज्यांनी १८३१ मध्ये या मंदिराची स्थापना केली.