महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपाडा इमारत दुर्घटना; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत - 5 lakh help relatives nagpada building

दुर्घटनेबद्दल माहिती मिळताच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पालकमंत्री अस्लम शेख
पालकमंत्री अस्लम शेख

By

Published : Aug 27, 2020, 10:21 PM IST

Updated : Aug 27, 2020, 10:38 PM IST

मुंबई- नागपाडा परिसरातील अब्दुल रहमान या इमारतीचा काही भाग आज कोसळला. या दुर्घटनेत एकूण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षीय वृद्धेसह १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

माहिती देताना पालकमंत्री अस्लम शेख

घटनेबद्दल माहिती मिळताच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस आमदार अमिन पटेल व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा-सिगारेट आणण्यास नकार दिल्याने युवकाचा खून, घाटकोपरमधील घटना

Last Updated : Aug 27, 2020, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details