मुंबई - मातोश्रीवर निवावी फोन आला होता, या वृत्ताला कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दुजोरा दिला आहे. 'दाऊद गॅंगकडून बोलतोय, मला मुख्यमंत्री यांच्याशी बोलायचं आहे', अशी प्राथमिक माहिती आहे, असे परब म्हणाले. मात्र, त्याने मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. त्या फोनची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.
मातोश्रीवर निनावी फोन आला; मात्र, धमकी दिली नसल्याचे अनिल परब यांचे स्पष्टीकरण - मातोश्री धमकी प्रकरण
खरंच ती व्यक्ती दाऊद गँगशी संबंधित आहे का? याचा पोलीस तपास करतील. आजपर्यंत अशी धमकी देण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती आणि सरकार अशी धमकी देणाऱ्यांना सोडणार नाही. मात्र, याची खात्री पोलीस करतील त्यानंतर सरकार आपला निर्णय घेईल, असे परब यांनी निनावी फोनबाबत म्हटले.
ते पुढे म्हणाले, खरंच ती व्यक्ती दाऊद गँगशी संबंधित आहे का? याचा पोलीस तपास करतील. आजपर्यंत अशी धमकी देण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती आणि सरकार अशी धमकी देणाऱ्यांना सोडणार नाही. मात्र, याची खात्री पोलीस करतील त्यानंतर सरकार आपला निर्णय घेईल, असे परब यांनी निनावी फोनबाबत म्हटले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुरक्षेचा आढावा वारंवार घेतला जातो. या फोननंतर पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने केल्याचे परब म्हणाले.
हेही वाचा -दाऊद इब्राहिमकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी..