महाराष्ट्र

maharashtra

Fake Call Centers : अमेरिकी ग्राहकांना व्हियाग्रा विकणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; पाच जणांना अटक

By

Published : Dec 14, 2022, 4:55 PM IST

Updated : Dec 14, 2022, 8:39 PM IST

अमेरिकन नागरिकांना प्रतिबंधित असलेली औषधे (Selling Viagra to American Consumers ) अर्ध्या किमतीत विक्री करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या (Financial fraud of customers) कॉल सेंटरचा (Fake Call Centers)बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी पाच जणांना (five arrested) अटक

Fake Call Centers
गोराईत व्हायग्रा विकणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

मुंबई :बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध कॉल सेंटरच्या (Fake Call Centers) माध्यमातून अमेरिकेत बंदी असलेली कामोत्तेजक औषधे (Selling Viagra to American Consumers ) सवलतीच्या दरात खरेदी करण्याचे आमिष दाखविले जात आहे. ग्राहकांकडून क्रेडिट डेबिट काढण्याच्या बहाण्याने अमेरिकन चलनामध्ये पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छापा टाकून पर्दापाश केला आहे. आरोपी अमेरिकी ग्राहकांना कामोत्तेजक औषधांचे आमिष दाखवून गंडा (Financial fraud of customers) घालायचे. या प्रकरणी पाच जणांना अटक (five arrested) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 13 हार्ड डिस्क आणि 2 कॉम्प्युटर जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमेरिकी ग्राहकांना लुबाडणाऱ्यांना अटक

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश :गोराई येथील एका बंगल्यात बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी सत्यता पडताळली. उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय माडये आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सोमवारी रात्री त्या बंगल्यात छापा टाकून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. त्या कॉल सेंटरमध्ये एकूण 13 जण काम करत होते. कॉल सेंटर प्रकरणी पोलिसांनी रवी, जितेंद्र, शकील, शबीर आणि संतोषीला ताब्यात घेऊन अटक केली. घटनास्थळाहून पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त केले आहेत.

प्रतिबंधित कामोत्तेजक औषधांच्या नावे फसवणूक : बोरिवली पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जायची. प्रतिबंधित कामोत्तेजक औषधे 50 टक्के सवलतीत विकण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली जात होती. पैसे दिल्यानंतर उत्पादने वितरित केली जात नसत असे पोलिसांनी सांगितले.

बंगल्यात कॉल सेंटर :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोराई येथील ज्या बंगल्यात कॉल सेंटर चालवले जात होते, तेथे पूर्वी कोचिंग क्लासेस चालवले जायचे. आरोपींनी बंगला भाड्याने घेतला होता आणि मार्च महिन्यापासून लाइफस्टाइल फिटनेस सेंटरच्या बहाण्याने कॉल सेंटर चालवले होते. बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांना एका माहितीदाराने याबाबत माहिती दिली. "डीसीपी अजय कुमार बन्सल यांच्या देखरेखीखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. दहशतवाद विरोधी पथक, सायबर सेल आणि डिटेक्शनच्या अनेक अधिकाऱ्यांना छाप्यासाठी पाठवण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विजय माडये यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. दोन महिलांसह 16 जणांनी घटनास्थळावरून 11 हार्ड डिस्क आणि संगणक जप्त केले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अकरा कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले.

पाच जणांना अटक :पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान असे आढळून आले की, आरोपी अमेरिकेतील लोकांना व्हायग्रा, सियालिस, लेविट्रा आणि जेली यासारख्या कामोत्तेजक औषधे विक्री करण्याच्या बहाण्याने फोन करायचा आणि त्यांची ऑर्डर बुक करण्याचा बहाणा करून पैसे घेत असे. क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर ज्या व्यक्तीने उत्पादने ऑर्डर केली होती त्या व्यक्तीला डिलिव्हरी करण्यात यायचीच नाही. कॉल सेंटरच्या मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली. तर सूत्रधार अद्याप फरार आहे. केंद्राचा मालक रवी ललवाणी (४४) असे अटक आरोपींचे नाव आहे. जितेंद्र मित्तल, आयटी तज्ज्ञ शब्बीर खान, अकाउंटंट शकील शेख आणि संतोषी संघवी टीम लीडर लाइफस्टाइल फिटनेस कॉल सेंटरच्या प्रभारी देखील आहेत.

मास्टरमाईंड फरार : मास्टरमाईंड शादाब शेख हा फरार आहे. त्याला यापूर्वी मुंबई आणि दुसऱ्या राज्यात अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. आम्ही त्याचा शोध घेत आहोत," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम २७६, ४१७, ४१९, ४२० आणि ३४ आणि आयटी कायद्याच्या कलम ६५, ६६(के), ६६(डी), ७२(अ), आणि ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

Last Updated : Dec 14, 2022, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details