महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फडणवीसांनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी दिल्लीत बसावे' - महसूल मंत्री बाळासाहोब थोरात - balasaheb thorat

देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत चांगलच वजन आहे. हे वजन त्यांनी राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी वापरले पाहिजे, असे सांगून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्राला रेमडेसिवीर दिले जाऊ नये, हा केंद्राचा आदेशही दुर्देवी असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहोब थोरात
बाळासाहोब थोरात

By

Published : Apr 19, 2021, 9:48 PM IST

मुंबई -देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत चांगलच वजन आहे. हे वजन त्यांनी राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी वापरले पाहिजे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाणे आवश्यक आहे. मात्र, ते रेमडेसिवीरच्या साठ्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले हे दुर्दैव आहे, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. महाराष्ट्राला रेमडेसिवीर दिले जाऊ नये. हा केंद्राचा आदेशही दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी दिल्लीत बसावे
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्यावर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याच वाटप झाले पाहिजे. हा राज्य सरकारचा आग्रह होता. मात्र, रेमडेसिवीरच्या साठ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनला जाणं हे आम्हाला पटलेलं नाही. एक जबाबदार विरोधीपक्ष नेते म्हणून रेमडेसिवीर सरकारला मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत करण आवश्यक होत. भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून कंपनी व्यवस्थापकाला पाठीशी घालणे योग्य नाही. ज्या कंपनीकडून रेमडेसिवीर घेणार होते. त्याच कंपनीला गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल ते मदत केली पाहिजे. मात्र, दुर्दैव आहे की ते पोलीस स्टेशनला जात आहेत, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ऑक्सिजनची राज्यात मोठी कमतरता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन हवाई मार्गातून आणण्यात यावा अशी मागणी केंद्राकडून केली होती. मात्र, आता रेल्वेच्या मार्गाने ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळणार आहे ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे. लवकरच विशाखापट्टणम येथून रेल्वेच्या मार्गाने महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळेल असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिले. मात्र, रुग्णांना ऑक्सीजन लागू नये यासाठी राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळे तीस तारखेपर्यंतचा असलेला लॉकडाऊन जनतेने व्यवस्थितपणे पाळला तर त्याचा खूप मोठा फायदा होईल.
महाराष्ट्राला रेमडेसिवीर देऊ नये...

महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये, असा केंद्राचा आदेश हा दुर्देवी असल्याचं यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त केले. केंद्राच्या या आदेशाचा त्यांच्याकडून निषेध करण्यात आला.

लॉकडाऊनसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा...

लॉकडाऊन मध्ये जनतेची उत्स्फूर्तता अधिक महत्त्वाची आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे पोलिसांनी दंडुक हातात घेतला होता. तसा या वेळी पोलीस करत नाहीयेत. तसेच सरकारने देखील त्यांना निर्देश दिले आहेत. मात्र कडक लॉकडाऊन करण्यासाठी पोलिसांनी दंडुका हातात घेणे गरजेचे नाहीये. तर, नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे या वेळेस बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले. काही ग्रामीण भागामध्ये नागरिकांकडून लॉकडाऊनचे सर्व नियम कडकपणे पाळले जातात. त्यामुळे त्या भागात कोरोना नक्कीच लवकर आटोक्यात येईल, अशी आशा देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details