मुंबई- मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत ते लोणावळा रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ रेल्वेच्या मदतीला धावून आले आहे. या मार्गावर 180 जास्तीच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.
कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाची दुरुस्तीनिमित्त रेल्वेगाड्या रद्द; एसटी महामंडळ सोडणार १८० जादा बसेस
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
फाईल फोटो
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये मुंबई विभागातून 50, ठाणे विभागातून 50, पुणे विभागातून 70 आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून 10 अशा 180 बसेसचा समावेश आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या धावतील.