मुंबई - वरळी येथील जुन्या पासपोर्ट ऑफिसजवळील इमारतीत असलेल्या लॅबमध्ये लिक्विड नायट्रोजन गॅसचा स्फोट झाला आहे. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत एक महिला जखमी झाली असून तिने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
वरळीत नायट्रोजन गॅस टाकीचा स्फोट, महिला जखमी - mumbai naitrogen blast update
वरळी येथील जुन्या पासपोर्ट ऑफिसजवळील इमारतीत असलेल्या लॅबमध्ये लिक्विड नायट्रोजन गॅसचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक महिला जखमी झाली आहे.
वरळी येथील वीर सावरकर रोडवर जुन्या पासपोर्ट ऑफिसजवळ सेंच्युरी इमारत आहे. या इमारतीमध्ये लॅबरोटरी आहे. या लॅबरोटरीमध्ये सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी लिक्विड नायट्रोजन गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल तसेच महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या दुर्घटनेत एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या महिलेला पोलीस, अग्निशमन दल तसेच पालिकेने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. या घटनेत इतर कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.