महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रतन टाटांच्या बिल्डारांबाबतच्या वक्तव्यावर तज्ज्ञांच्या परखड प्रतिक्रिया - रतन टाटा बिल्डरांवर भडकले

आजच्या झोपडपट्ट्यांना, उभ्या झोपडपट्ट्यांना बिल्डर जबाबदार हे तर कुणीही मान्य करेल. मात्र, त्याचवेळी टाटा हे देखील एक बिल्डर असून त्यांनी ही असा विकास केला आहे, हे विसरून चालणार नाही, असे परखड मत बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केले आहे.

रतन टाटा  ratan tata  उद्योजक रतन टाटा  रतन टाटा बिल्डरांवर भडकले  ratan tata news
मुंबई झोपडपट्टी

By

Published : Apr 22, 2020, 12:32 PM IST

मुंबई - कोरोनाची दहशत मुंबईत पसरली असून कोरोनाने झोपडपट्टी आणि एसआरए पुनर्विकसित इमारतींना लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर बिल्डरांमुळेच आज मुंबईवरही परिस्थिती आली आहे. बिल्डरांनी उभ्या झोपडपट्ट्या वसवल्या, त्यात कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे आजच्या परिस्थितीला बिल्डर जबाबदार आहेत, असे वक्तव्य उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे. टाटा यांचे हे वक्तव्य 100 टक्के खरे आहे, असे म्हणत आता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनीही याला पाठिंबा दिला आहे. तसेच काहींनी त्यांच्या या वक्तव्यावर परखड प्रतिक्रिया दिल्या.

एका परिसंवादात बोलताना टाटा यांनी आजच्या परिस्थितीला बिल्डरांना जबाबदार धरले आहे. बिल्डरांनी झोपडपट्टी पुनर्विकासातून प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचवेळी उभ्या झोपडपट्ट्या विकसित करत लोकांच्या समस्या वाढवल्या. या पुनर्विकसित इमारतीमध्ये ना मोकळी हवा ना इतर सुविधा, असे म्हणत टाटानी बिल्डरांवर निशाणा साधला.

महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी हे वक्तव्य अगदी बरोबर असल्याचे म्हटले आहे. मुळात एसआरए योजना योग्य प्रकारे राबवली गेली नाही. बिल्डरांनी फक्त पैसा पाहिला. उभ्या झोपडपट्ट्या वसवल्या. त्यांना सुविधा काहीच दिल्या नाहीत. त्यामुळे आता तरी सरकारने झोपडपट्टीवासीयांच्या गृहनिर्माण संस्था स्थापन करत त्यांना पुनर्विकास करू द्यावा. बिल्डरांना यातून हद्दपार करावे, अशी भूमिका प्रभू यांनी मांडली आहे.

टाटाही एक बिल्डरच आहेत-

आजच्या झोपडपट्ट्यांना, उभ्या झोपडपट्ट्यांना बिल्डर जबाबदार हे तर कुणीही मान्य करेल. मात्र, त्याचवेळी टाटा हे देखील एक बिल्डर असून त्यांनी ही असा विकास केला आहे, हे विसरून चालणार नाही, असे परखड मत बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केले आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) ने मात्र सावध भूमिका घेतली आहे. बिल्डरांनी एसआरएमध्ये सोयीसुविधा पुरवल्या नाहीत. उभ्या झोपडपट्ट्या वसवल्या हे खरे आहे तितकेच नोकरशाह, सरकारी यंत्रणा ही याला जबाबदार आहे, असे बीएआयने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details