मुंबई Wadia Hospital: प्रभादेवी रोड येथे राहणाऱ्या सुनीता गंजेजी यांची जून महिन्यात परळ येथील वाडिया रुग्णालयात प्रसूती झाली. ७ जूनला गंजेजी दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कारण त्यांच्या आयुष्यात नव्या बाळानं जन्म घेतला होता. ७ जूनला रात्री ९ वाजता सुनीता गंजेजी यांची प्रसूती झाल्यानंतर त्या रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होत्या. दरम्यान, वाडिया रुग्णालय येथील लेबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या संबंधित डॉक्टर, नर्सेस यांनी सुनीता यांनी जन्मास घातलेल्या मुळ मुलास, त्याचा लेबर वॉर्डमध्ये जन्म झाल्यानंतर तत्काळ न दाखवून निष्काळजिपणा केला. असा आरोप डॉक्टर आणि नर्सेसवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळं तक्रारदार यांचे मुळ मुलं बदली होण्यास कारणीभूत ठरले आहे. तक्रारदार सुनीता यांनी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व नर्सेस यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
डीएनए तपासणी केली :७ जूनला तक्रार आल्यानंतर भोईवाडा पोलिसांना डीएनए तपासणी केली. त्याचा अहवाल आला असून तो मॅच होत नाही. मात्र, ही डीएनए तपासणी खासगी लॅबमधून केल्यानं पोलीस तपासात तो अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून भोईवाडा पोलिसांनी सरकारी लॅबमधून डीएनए तपासणी करण्यासाठी रितसर गुन्हा दाखल केला आहे. सुनीता गंजेजी यांना मुलगा झाला असून डॉक्टर आणि नर्सेस यांनी बदली करून मुलगी आणून दिली असल्याचा आरोप तक्रारदार सुनीता गंजेजी यांनी केला आहे.