महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - Bulletin

या देशाने कधीही अहंकार सहन केला नाही. असाच अहंकार दुर्योधनातही होता, असा टोला प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. आयसीएसईच्या दहावी परीक्षेत जुहूतील जमनाबाई नरसी स्कूलची जुही कजारिया ही देशात टॉपर. ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल घेत खैरखेडा गावात रोज ४८ हजार लिटर पाणी टँकरद्वारे देण्याचा निर्णय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी शाळेवर समृद्धी महामार्गामुळे बुलडोजर चालवले जाणार.

सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..

By

Published : May 7, 2019, 7:00 PM IST

..असा अहंकार दुर्योधनातही होता; मोदींना प्रियंका गांधींचा टोला
अंबाला - महाभारतातील एक प्रसंग सांगताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. त्या म्हणाल्या की, इतिहास साक्षी आहे की, या देशाने कधीही अहंकार सहन केला नाही. असाच अहंकार दुर्योधनातही होता.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vRU9Dv

मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये - प्रकाश आंबेडकर
पुणे - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी घसरलेली असून, त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2LtbOfg

आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईची जुही कजारिया प्रथम

मुंबई -सलग तीन वर्षे आयसीएसईच्या परीक्षेत मुंबई विभागाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. आयसीएसईच्या दहावी परीक्षेत जुहूतील जमनाबाई नरसी स्कूलची जुही कजारिया ही देशात टॉपर ठरली आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2J7OLo3

ईटीव्ही भारतच्या बातमीने प्रशासनाला आली जाग; खैरखेडा गावाला दररोज मिळणार ४८ हजार लिटर पाणी
वाशिम -ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल घेत प्रशासनाने खैरखेडा गावात रोज ४८ हजार लिटर पाणी टँकरद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vK7U6U

'मुख्यमंत्रीसाहेब, तुमच्या 'समृद्धी'साठी आमची शाळा पाडून परत भीक मागायला लावू नका'
आमरावती -नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी लोकवर्गणीतून चालत असलेल्या शाळेवर समृद्धी महामार्गामुळे बुलडोजर चालवले जाणार आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vKZ214

बातमी, सर्वांच्या आधी...
www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details