महाराष्ट्र

maharashtra

आज...आत्ता... बुधवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : Jun 26, 2019, 7:01 PM IST

विश्वकरंडक स्पर्धेत भारताची विराटसेना दिसणार 'भगव्या' रंगात दिसनार असून नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. तर या भगव्या रंगामुळे राजकीय वातावरण तापले असून अल्पसंख्याक आमदारांनी या जर्सीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसमधील बंडखोर माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी मातोश्रीवर भेट घेतली. तर वाशिमध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध केला आणि कॅब चालकाने नियोजित दिशेत ५०० मीटरचा बदल केला तर गुगल मॅप तुम्हाला नोटिफेकेशन देणार आहे.

आज...आत्ता... बुधवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

विश्वकरंडक स्पर्धेत भारताची विराटसेना दिसणार 'भगव्या' रंगात, नव्या जर्सीचे अनावरण

नवी दिल्ली - सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. ३० जूनला भारताचा सामना इंग्लडशी होणार आहे. वाचा सविस्तार

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून पेटले राजकारण, भगवीकरण होत असल्याचा 'या' नेत्याचा आरोप

मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघ 30 जून रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भगवी जर्सी घालून सामना खेळणार आहे. या भगव्या रंगामुळे राजकीय वातावरण तापले असून अल्पसंख्याक आमदारांनी या जर्सीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर सत्ताधारी आमदारांनी राष्ट्रीय ध्वजातल्या भगव्या रंगावर नाराजी कसली? हा प्रश्न उपस्थित केला. एकूणच भगव्या रंगाच्या जर्सीमुळे राजकीय सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर

काँग्रेसचे अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई - काँग्रेसमधील बंडखोर माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी मातोश्रीवर भेट घेतली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर

'दगडाची पेरणी' करत शेतकरी संघटनेकडून शासनाचा निषेध; पिककर्ज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

वाशिम - शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध केला. जिल्ह्यातील वसारी गावात दगडाची पेरणी करून शेतकरी संघटनेने शासनाचा धोरणाला विरोध केला. शासनाने कर्जमाफी केली असली तरी अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. वाचा सविस्तर

कॅब चालकाने चुकीच्या दिशेने वाहन नेल्यास गुगल मॅप देणार अलर्ट

नवी दिल्ली - तुम्ही जर ओला किंवा उबेरने मध्यरात्री प्रवास करणार असेल तर गुगल मॅप तुमच्या सुरक्षेची काळजी घेणार आहे. जर कॅब चालकाने नियोजित दिशेत ५०० मीटरचा बदल केला तर गुगल मॅप तुम्हाला नोटिफेकेशन देणार आहे. त्यानंतर प्रवाशाला संबंधित कॅब कंपनी, जवळचे व्यक्ती किंवा पोलिसांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details