आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - bulletin
निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेच्या घातपाताचा कट उघडकीस आला आहे. नागपूरातील ३०० शाळा बंद होण्याची शक्यता आहे. अंबरनाथमध्ये लग्नमंडपात नवरीने केली डॅशिंग एन्ट्री.
खुशखबर....मान्सून निकोबारमध्ये दाखल
पुणे - कडक उन्हाळ्याचा तडाखा बसलेल्यांना तसेच दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्यांना एक सुखद बातमी आहे. आज शनिवारी नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) निकोबारमध्ये दाखल झाले आहेत. हवामान विभागाने १८ मे ला मोसमी वारे निकोबारमध्ये दाखल होणार, असा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. वाचा सविस्तर..
मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार - राज ठाकरे
मुंबई - मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नव्हती, तर मग मोदी पत्रकार परिषदेला कशासाठी आले? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर..
पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेच्या घातपाताचा कट उघडकीस
पुणे - पश्चिम महाराष्ट्रात लोहमार्गावर रेल्वे गाड्यांचा अपघात घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे मंडळाने या प्रकाराची दखल घेतली असून रेल्वे पोलिसांनी संशयितांचा तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर..
नागपूरातील ३०० शाळा होणार बंद?
नागपूर - आर्थिक भार कमी करण्यासोबतच दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांची संख्या ही ३०० च्यावर आहे. वाचा सविस्तर..
अंबरनाथमध्ये लग्नमंडपात नवरीची डॅशिंग 'एन्ट्री'; वऱ्हाडी मंडळींना बसला आश्चर्याचा धक्का!
ठाणे -लग्नात इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील कानसई गावात राहणारी नववधू विवाहस्थळापर्यंत स्वतः जीप चालवत आली. नववधूची ही डॅशिंग एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. वाचा सविस्तर..