'चौकीदार ही चोर है'.., ममता दीदींच्या सभेत घोषणा
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामधील वाद थांबताना दिसत नाहीत. अमित शाह यांच्या मंगळवारी झालेल्या रॅलीनंतर तर एकमेकांवर टीका करण्याचे सत्र सुरुच आहे. अशावेळी ममता बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर येथे सभेतील लोकांना 'चौकीदार ही चोर है'.. च्या घोषणा द्यायला लावल्या. वाचा सविस्तर..
नथुराम गोडसे देशभक्त; प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली - महात्मा गांधी यांचा खून करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आहेत. ते देशभक्तच राहतील असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या भोपाळ येथील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. वाचा सविस्तर..
आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...
ममता बॅनर्जी यांच्या सभेत 'चौकीदार ही चोर है'..च्या घोषणा देण्यात आल्या. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर संघ आणि भाजपला मदत करतात असल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा आरोप केला. पालक सचिवांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी सिन्नरमध्ये रातोरात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. भद्रावती-वरोरा मार्गावर मोहन भागवतांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला.
प्रकाश आंबेडकर संघ आणि भाजपला मदत करतात; वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा गंभीर आरोप
नागपूर - प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करतात. तसेच वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही निवडणुकीत भाजपला जिंकविण्यासाठी करण्यात आली, असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ता मिलिंद पखाले यांनी केला आहे. त्यांनी आज पूर्व विदर्भातील अनेक नेत्यांसोबत पक्षाला रामराम ठोकला असून यावेळी बोलतना त्यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर..
प्रशासनाचा दिखावा? पालक सचिवांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी सिन्नरमध्ये रातोरात सुरू केल्या चारा छावण्या
नाशिक - राज्याच्या पालक सचिवांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांaनी दिले होते. त्यानंतर आज नाशिकचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी सिन्नरचा दौरा केला. मात्र, या दौर्याच्या धास्तीमुळे येथील प्रशासनाने एका रात्रीतच चारा छावण्या उभ्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, अनेक शेतकर्यांनी तर स्व:खर्चाने जनावरांसाठी तात्पुरता आसरा उभा केल्याचेही वास्तव समोर आले आहे. त्यामुळे सरकारी अधिकार्यांच्या आणि पालक सचिवांचा हा दौरा दिखावा असल्याची चर्चा सध्या सिन्नरमध्ये सुरू झाली आहे. वाचा सविस्तर..
मोहन भागवतांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; भद्रावती-वरोरा मार्गा वरील घटना
चंद्रपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. वरोरा-भद्रावती मार्गावरील नांदुरी गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. या अपघातात मोहन भागवत यांना कोणतीच इजा झालेली नाही. ते नियोजित दौऱ्यानुसार पुढे निघून गेले आहेत. वाचा सविस्तर..