आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...
मी, माझे वडील आणि माझ्या आजी-आजोबांबद्दल मोदींच्या मनात द्वेष असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अतिरिक्त कामामुळेच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचे अपहरण केले. बुलडाण्यातील चिंचोली गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जात असल्याचा आरोप आमदार सुरुपसिंग नाईक यांनी केला आहे.
मी, माझे वडील आणि माझ्या आजी-आजोबांबद्दल मोदींच्या मनात द्वेष - राहुल गांधी
शुजलपूर - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अखेरचे दोन टप्पे पार पडणे बाकी आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, माझ्या आजीबद्दल प्रचंड द्वेष आणि तिरस्कार आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मला त्यांच्या मनातून हा द्वेष संपवायचा आहे. म्हणून मी त्यांना झप्पी देतो. त्यांची गळाभेट घेतो,' असे राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील शुजालपूर येथील प्रचारसभेत म्हटले. वाचा सविस्तर..
मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; अतिरिक्त कामामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
मुंबई - मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रीती लोकेश अत्राम-धुर्वे (वय ३१) यांचा नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. लोकसभा निवडणुकीचे काम बळजबरीने करायला लावल्यामुळेच प्रीती यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वाचा सविस्तर..
...यासाठी प्रियकराच्या मदतीने आईनेच केले मुलाचे अपहरण
औरंगाबाद - विमाच्या पैशासाठी प्रियकराच्या मदतीने आईनेच स्वताच्या मुलाचे अपहरण करण्याची घटना घडली आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर मुलाच्या नावे बँकेत जमा असलेले सात लाख रुपयांसाठी आईनेच प्रियकराच्या मदतीने अपहरणाचा कट रचला. या प्रकरणी दोघा विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा वाघ, राजू रायकवार असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तर आयुष असे अपहरण झालेली सहा वर्षीय मुलाचे नाव आहे. वाचा सविस्तर..
दुष्काळाचा दाह.. बुलडाण्यात हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत; चिंचोली गावात भीषण परिस्थिती
बुलडाणा - जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे तर अनेक गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. शेगाव तालुक्यातील चिंचोली गावासाठी प्रशासन उदासीन असून गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकही पेयजल योजना राबवली गेली नाही. त्यामुळे भीषण पाणी टंचाईमुळे जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वाचा सविस्तर..
नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला..
नंदुरबार - महाराष्ट्र शासनाद्वारे नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नवापूर तालुक्यातील नागन प्रकल्पातून भरडू गावाजवळ असलेल्या सरपनी नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. परंतु, जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामांमुळे या पाण्याचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांपेक्षा गुजरातला होताना दिसून येत आहे. वाचा सविस्तर..