जवानांनी उधळला घातपाताचा कट; नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटकं जप्त
गोंदिया -नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटके 'सी ६०' पथकातील जवानांनी जप्त केली आहेत. नक्षलवाद्यांनी ही स्फोटकं सालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुर्कडोह गावाजवळील नाल्यात लपवून ठेवली होती. ही स्फोटकं जप्त केल्याने भविष्यात होणारा मोठा घातपात जवानांनी उधळून लावला आहे.वाचा सविस्तर...
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कार, दोघे गजाआड
नांदेड - कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यामधील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत तिघांनी महिलेवर अत्याचार केला होता. तसेच पीडितेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानंतरही त्यांनी वारंवार अत्याचार केले होते.वाचा सविस्तर...
मंदिर परिसरात मांस खाल्ल्याच्या कारणावरून कामगारांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भहेडी तालुक्यात मंदिर परिसरात मांस खाल्ल्याच्या कारणावरून गोरक्षकांनी काही कामगारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वाचा सविस्तर...
महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी कन्नड शिकून घ्यावी; 'या' खासदाराने व्यक्त केली अपेक्षा
सोलापूर- सोलापुरातील अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्यावी, अशी अपेक्षा सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या कुडल संगम येथील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. कन्नड बहुल असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त भाषणही कन्नड मधून होत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी कन्नड शिकून घ्यावी असे खासदारांनी म्हटलं आहे.वाचा सविस्तर...
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत.. घोटाळ्याच्या चौकशीसाठी 'ईडी'कडून समन्स
नवी दिल्ली- उड्डयनमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी निदेशालयाकडून (ईडी) राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी पटेल यांना ६ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.वाचा सविस्तर...