महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - viru devgon

राज्यातील पाणी टंचाईचा एकत्रित आढावा.. जाणून घ्या कुठल्या शहरात किती दिवसानंतर होतो पाणीपुरवठा.. बारावीचा निकाल होणार उद्या जाहीर..आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी, युवा सेनेची मागणी.. ढगाळ वातावरणात रडार विमानांना शोधू शकत नाही, मोदींच्या वक्तव्याला हवाई दलाकडून पुष्टी.. तर अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई

By

Published : May 27, 2019, 7:02 PM IST

प्रगत महाराष्ट्रात दरदिवशी पाणी मिळणे मुश्कील... जाणून घेऊया कुठल्या शहरात किती दिवसानंतर होतो पाणीपुरवठा

मुंबई - राज्यात सध्या १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयावह परिस्थिती आहे. तर, दुसरीकडे दुष्काळ पाण्याचा आहे की नियोजनाचा, असा प्रश्न पडतो आहे. इतका गंभीर दुष्काळ असूनही सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झटून कामाला लागलेले नाही. दुसरीकडे, जनावरे आणि हजारो कुटुंबे तहानेने व्याकुळ झाली आहेत. राज्यात काही ठिकाणी दोन-तीन दिवसाला तर, काही जिल्ह्यांमध्ये २०-२० दिवसानंतर नागरिकांना पाणी पाहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील काही जिल्ह्यांचा घेतलेला आढावा... अधिक वाचा

प्रतीक्षा संपली.. हूरहूर वाढली.. उद्या जाहीर होणार बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल

मुंबई - महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाने HSC म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी म्हणजे दुपारी 1 वाजता लागणार असल्याची माहिती दिली आहे. अधिक वाचा

आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी; युवा सेनेची मागणी

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर शिवसेनेने आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युवासेनाही सक्रीय झाली आहे. आता तर थेट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीच विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी युवासैनिकांकडून करण्यात येत आहे. अधिक वाचा

होय.. ढगाळ वातावरणात रडार विमानांना शोधू शकत नाही, मोदींच्या वक्तव्याला हवाई दलाकडून पुष्टी

भटिंडा - आकाशात ढगाळ वातावरण असताना विमान रडारच्या कक्षेत येत नाहीत, असे वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांकडून ट्रोल झाले होते. मात्र, मोदींचा दावा खरा असून ढगाळ वातावरणात रडारला लढाऊ विमाने शोधण्यास अडचणी येतात, अशी माहिती हवाई दलाचे कमांडिंग इन चीफ रघुनाथ नांबियार यांनी दिली. अधिक वाचा

अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांचे दिर्घ आजाराने निधन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांचे आज मुंबईत निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मुंबईच्या सांताक्रुझ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अधिक वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details